Order of Divisional Commissioner Saurabh Rao | New responsibility on ZP CEO Dilip Swami
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, नातेपुते, श्रीपुर-महाळुंग, वैराग व माढा या पाच नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशान्वये पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यावर नवी जबाबदारी दिली आहे. दिलीप स्वामी हे पाच ही नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
त्यांच्या सोबतीला अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव व पुणे महाऊर्जाचे अप्पर जिल्हाधिकारी सुजित वाघमारे हे दोन अधिकारी निवडणूक निरिक्षक म्हणून राहणार आहेत. या निवडणुकीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राव यांनी केल्या आहेत.


















