सोलापूर शहर हद्दीत जुळे सोलापूर भागात विजापूर नाका पोलिस स्टेशन आहे. विजापूर – सोलापूर रस्त्यावर कंबर तलाव लगत सोलापूर महानगरपालिकेचा जुना विजापूर जकात नाका होता. तर याच नावाने विजापूर नाका पोलिस स्टेशन देखील झाले. मात्र सोलापूर शहराचा या भागात झालेला विस्तार, रहिवास क्षेत्र पहाता हा भाग प्रती जुळे सोलापूर म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे विजापूर नाका पोलिस स्टेशन नांव संयुक्तीक वाटत नाही.
सोलापूर शहरात जुळे सोलापूर म्हणून रहिवास क्षेत्र असलेल्या पोलिस आयुक्त सोलापूर कार्यक्षेत्रातील विजापूर नाका पोलिस स्टेशनचे नामकरण “जुळे सोलापूर पोलिस स्टेशन” करण्याची मागणी पृथ्वीराज माने युवा मंचच्या वतीने पोलिस उपायुक्त वैशाली कडुकर यांना निवेदनाव्दारे करण्यात आली.
यावेळी मंचचे अध्यक्ष सुनील जाधव समन्वयक उमेश भगत, सचिव तात्या कदम, अजय सोनटक्के, किरण बंडगर, सागर वाघमाेडे, ओंकार केंगार, महेंद्र खटके, महेश घाडगे, सतीश मस्के, अनिल हिबारे, प्रदीप सुरवसे,सागर वाघमोडे, परमेश्वर कलशेट्टी,आदि उपस्थित होते
















