सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कुंभारी भागातील रे नगर या 30 हजार घरकुल योजनेसाठी मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत. त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीमधून रस्त्यांसाठी तब्बल 50 कोटीच्या निधीची मागणी आहे. आपला या प्रोजेक्टला विरोध नाही पण आपल्या डीपीसी मधून एवढा निधी द्यायचा का? असा सवाल स्वतः पालकमंत्र्यांनी उपस्थित केला. यासाठी राज्यसरकारने निधी द्यावा असे ते म्हणाले. त्यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी सोलापूर जिल्ह्यात नगरपालिका मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत, त्यांनाही निधी लागणार आहे मग जिल्हा नियोजन समिती तून किती निधी देणार याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे बैठक लावावी अशी मागणी पुढे आली. याला सर्व आमदारांनी पाठिंबा दिला…. पहा हा व्हिडीओ…

















