राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर व जिल्हा निरिक्षक पदी सुरेश घुले यांची निवड प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील यांनी निवडीचे पत्र सुरेश घुले यांना दिले असून सोलापूर शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबुती व बळकटीकरण देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, आगामी सहा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची त्वरित बैठक घ्यावी तसेच आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपण त्वरित पंढरपूर येथे जाऊन नेते कार्यकर्ते यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना कराव्यात असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घुले यांना सूचना केल्या आहेत दरम्यान सुरेश घुले यांच्या निवडीबद्दल सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष भारत जाधव ,कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी अभिनंदन केले आहे