सोलापूर : जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. या निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होत आहे. अक्कलकोट 20, पंढरपूर 11, बार्शी 22, माढा 8, मंगळवेढा 18, मोहोळ 10, माळशिरस 35, उत्तर सोलापूर 12, दक्षिण सोलापूर 17, सांगोला 6, करमाळा 30
उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी ग्रामपंचायतचे सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष सुवर्णा झाडे यांनी आपल्या समर्थकांसह सोमवारी सरपंच पदासाठी आपला अर्ज दाखल केला.
यानंतर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, महिला सबलीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातून आपण सरपंच पदासाठी पहिला अर्ज भरलेला आहे त्याचा आनंद होतोय, सरपंच पदाचा अर्ज केवळ खुर्ची आणि पैसे कमवण्यासाठी नाही तर गावातील अडीअडचणी सोडवण्यासाठी महिला सक्षमीकरण करून गावच्या सुधारणा करण्यासाठी आपण सरपंच पदासाठी मैदानात उतरल्याचे त्यांनी सांगितले.