सोलापूर : माजी नगरसेविका राजेश्री चव्हाण यांनी घेतली कर्मवीर,भिकुजी(दादा) इदाते माजी केंद्रीय अध्यक्ष विमुक्त घुमन्तु एवं अर्ध घुमन्तू जनजाती कल्याण विकास बोर्ड नई दिल्ली भारत सरकार तथा निती आयोग सदस्य समिती भारत सरकार यांची भेट घेऊन आपल्या सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील समस्या बाबतीत निवेदन दिले.
तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त भिकुजी दादा इदाते हे कांही काळ सोलापुरात सात रस्ता येथील शासकीय विश्रामग्रह येथे उपस्थित होते. या वेळी सोलापूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका राजेश्री अनिल चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली व बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा,शाल, श्रीफळ,बुके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सोलापुरातील भटक्या विमुक्तांच्या व आधिवासी पारधी समाजातील अनेक समस्या बाबतीत विविध समस्यांवर त्यांनी आदरणीय दादा इदाते यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
या समस्यांचे निवेदन ही त्यांनी या वेळेस त्यांना दिले. याबाबत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आदरणीय दादांनी त्यांना दिले.
त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ बाळू काळे, हिंदू टाइम्सचे संपादक अनिकेत कुलकर्णी व असंख्य भटके विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच दि.२५ मे २०२२ रोजी दादा इदाते यांना,लंडन येथे हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.त्या निमित्त त्यांचा शाल व बुके देऊन सत्कार केला व त्यांच्या लंडन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
















