देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अकोला येथे भारत जोडो पदयात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी महाराष्ट्रातील विद्यापीठातील विविध विषयावर चर्चा केली.
राहुल गांधी यांना संवाद करीत असताना विद्यापीठातील कुलगुरू,प्र कुलगुरू, परीक्षा नियंत्रक यांच्या संदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
काही विद्यापीठांमध्ये पाञतेचे निकष पूर्ण नसताना सुद्धा फक्त आरएसएस विचारसरणीचे असल्यामुळे त्यांना कुलगुरू,प्र कुलगुरू पदे देण्यात आलेले आहेत व महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यापीठांमध्ये नागपूर जिल्ह्यातील आरएसएस विचारसरणीचे व्यक्ती या ठिकाणी आहेत. यासाठी आपण यामध्ये विशेष लक्ष द्यावे असा संवाद झाला. यावेळी राहुल गांधी यांनी ज्या ज्या विद्यापीठांमध्ये असे अधिकारी असतील त्यांची यादी माझ्याकडे द्या असे सकारात्मक संवाद केला.


















