सोलापूर : सोलापूरच्या रेल्वे स्थानकाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासाठी सोलापुरात सध्या जोर वाढला आहे मातंग समाजातील युवा कार्यकर्ते या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शनिवारी सोलापूर रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागातील टेरेस वर चढून कार्यकर्त्याने जोरदार घोषणाबाजी केली रेल्वे स्थानकाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्याकडे लक्ष वेधण्यात आले.
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा युवक अध्यक्ष पृथ्वीराज मोरे, सोहम लोंढे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. DPI च्या वतीने संपुर्ण महाराष्ट्र भर नामंतर आंदोलन उभे करणार असे सांगत आंदोलना मागील मुख्य उद्देश DPI प्रदेश युवक अध्यक्ष सोहन लोंढे यांनी सांगितला..कसे केले आंदोलन पहा हा व्हिडीओ
या आंदोलनास मातंग एकता आंदोलनचे रोहीत खिलारे यांनी स्वइच्छेने पाठींबा देवून सहभाग नोंदवला. कोविडचे नियम पालन करून सदर आंदोलन करण्यात आले.


















