सोलापूर : इंदापूर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाणी घेण्याचा राज्य सरकारने मंजुरी दिली त्यानंतर इंदापूरचे आमदार तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सोलापूरकरांनी संताप व्यक्त केला. काँग्रेस शिवसेनेने पालकमंत्री भरणे यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
सोलापूरकरांचा रोष पाहून भरणे मामा पंधरा दिवस सोलापूरला आले नाहीत त्यानंतर त्यांचा दौरा झाला. प्रशासनाची आढावा बैठक घेऊन इंदापूरच्या उपसा सिंचन योजनेवरून लोकांचे दुर्लक्ष व्हावे म्हणून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी धरणातून समांतर जलवाहिनी प्रस्तावित आहे त्याची बैठक घेतली.
पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री बदलण्याचा विषय निघाला असता ते चिडले पालकमंत्री बदलणे म्हणजे भाजीपाला आहे का? अशा शब्दात नाराजी व्यक्त करत सोलापूरला आठ दिवसाआड पाणी मिळते याचे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून खूप दुःख होते परंतु येत्या पंधरा महिन्यात समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन सोलापूरला पाणी मिळेल अशी भाषा त्यांनी केली.
केवळ आठ दिवसात राष्ट्रवादीच्या वाटेवर असणारे महेश कोठे यांनी एका पत्रकार परिषदेत सोलापूरला अजून दोन ते अडीच वर्ष समांतर जलवाहिनीतून पाणी मिळणार नाही असे सांगून पालकमंत्री भरणे यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पहा कोण काय म्हणाले हा व्हिडीओ….