सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अधिकृत प्रवेश न केलेले नेते महेश कोठे यांनी 9 डिसेंबर रोजी सुधीर खरटमल यांच्या एका कार्यक्रमात खरटमल यांना काँग्रेसमध्ये जी सन्मानाची वागणूक होती, तोच सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मिळेल असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी समाचार घेतला आहे.
मुळात महेश कोठे अजूनही अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस मधील चित्र पाहता अजूनही त्यांना जम बसवता आला नाही, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये किती सन्मान दिला जातोय हे सोलापूरकर काय तर त्यांना स्वतःला पण माहित मात्र सांगणार कसं, मग ते सुधीर खरटमल यांना काय सन्मान मिळवून देणार? असा सवाल कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित केला .
सध्या महापालिका प्रभाग रचनेची तयारी सुरू आहे त्यामध्ये महेश कोठे यांनी प्रभाग रचनेचा संपूर्ण अभ्यास करून आराखडा तयार केला आहे. मात्र या आराखड्याला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचा विरोध आहे जे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत त्यांचाही विरोध असल्याची कुरबुर ऐकण्यास मिळते. याच कुरबुरी वरून सुधीर खरटमल यांनी काही नेत्यांची बैठक घडवून आणली. परंतु त्या बैठकीला शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांना मात्र बोलावले गेले नाही त्याची नाराजी जाधव आणि पवार यांच्या मनात कायम राहिली असल्याचे बोलले जाते.


















