सोलापूर : महानगरपालिकेचे 1075 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी सोमवारी अंदाजपत्रक माध्यमांसमोर सादर केले या बजेटमध्ये पाच टक्के तर वाढीचा बोजा सोलापूरकरांवर लादण्यात आला आहे तसेच तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी मांडलेल्या बजेट पेक्षा 40 कोटीने कमी बजेट यंदा मांडण्यात आले आहे. त्यावर काँग्रेस शहराध्यक्ष तथा महापालिकेचे माजी स्थायी सभापती चेतन नरोटे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी कर वसुलीवर भर द्यावा, पाच टक्के कर वाढिचा जो बोजा सोलापूरकरांवर लादण्यात आला आहे तो मागे घ्यावा यासह विविध सूचना महापालिकेला केल्या. पहा काय म्हणाले नरोटे..

















