सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सगळीकडे राजकीय वातावरण तापलेले असताना,पूर्व विभाग वाचनालय हॉल येथे हिंदुत्ववादी तरुणांनी एकत्र येऊन मेळावा घेतला. सर्व सामान्य कुटुंबातल्या तरुणाला महापालिकेत पाठविण्यासाठी चळवळ उभी करण्याचा निर्धार केला.
युवा संमेलनात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, यतीराज होनमाने,महेश जेऊर,संदीप महाले,कल्याण चौधरी,सतीश पारेली,विकास भास्कर,विकी चाकोते,बंटी बेळमकर, आशिष दुलंगे,अमर गट्टी,गुरुराज पदमगोंडा,विशाल बनसोडे,प्रवीण गलांडे,शिलवंत छपेकर,सागर सुरवसे,भीमाशंकर जमादार,ओंकार होमकर,आदीसह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
संमेलनात राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या,सर्व सामान्य कुटुंबातील अनेक तरुणांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रस्थापितांच्या हातातच सत्तेच्या चाव्या आणखीन किती दिवस द्यायच्या ही खंत देखील व्यक्त केली.
कार्यक्रम संयोजक समितीचे अक्षय अंजिखाने म्हणाले,राजकारणात संधी ही मिळत नसते,तर ती हिसकावून घ्यावी लागते,त्याच बरोबर राजकारणात कोणतेही गोष्ट अशक्य नसून लोकांनी इंदिरा गांधी यांना देखील निवडणुकीत पाडले असून,कोणाला जर मी म्हणजे सगळं काही असे वाटत असेल तर तो त्याचा खूप मोठा गैरसमज आहे, आज नगरसेवक लोक कंत्राटदार होऊन बसल्याने सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता असे समीकरण सुरू आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे याकरिता येणाऱ्या काळात सर्वसामान्य युवकांना महापालिकेत संधी मिळवण्यासाठी मोठी चळवळ उभी करूया अशी भूमिका मांडली.
प्रास्ताविकात यतीराज होनमाने म्हणाले, राजकारणात जो पर्यंत सर्व सामान्य कुटुंबातला व हिंदुत्ववादी विचाराने काम करणारा व्यक्ती, सत्ताकेंद्रात जाणार नाही, तो पर्यंत हा देश हिंदू राष्ट्र होणार नाही, आपण सर्वांनी एकत्र येऊन ही प्रस्थापितशाही मोडून काढली पाहिजे.
संयोजक समितीचे सागर अतनुरे म्हणाले,काही लोकांना राजकारणात आपली जहागिरी वाटत असून, या लोकांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आपणा सारख्या सामान्य कार्य करणाऱ्या तरुणाला संधी मिळणार नाही.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिलवंत छपेकर यांनी केले आभार ओंकार होमकर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, यतीराज होनमाने यांनी केले.

















