सोलापूर : होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने मागील तेरा दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या समोर चक्री उपोषण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौर्यावर होते.
त्यांनी नियोजन भवनात सोलापूर विकास मंच, जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया यांची संयुक्त बैठक लावली या बैठकीला खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख यांचीही उपस्थिती होती. विकास मंचच्या वतीने त्यांचे प्रमुख केतन शहा व इतर सहकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर माहिती देताना केतन शहा म्हणाले, पालकमंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत सोलापूरची विमान सेवा सुरू होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, चिमणी पाडकाम प्रकरणी अधिकारी जाणीवपूर्वक काडादी यांना न्यायालयात जाण्यासाठी वेळ देतात. विमानसेवेमध्ये चिमणी हाच मुख्य अडथळा आहे.8 सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांच्याकडून चिमणी पाडकाम होणार होते मात्र त्यांची बदली झाली त्यांची झालेली बदली तात्पुरती थांबवावी अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली असून ते याप्रकरणी निश्चित सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली.


















