सोलापूर-हैदराबाद रोडवरील श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. याच अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहे.
ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. एम एच क्यू डब्लू 9587 हा माल वाहतूक ट्रक थांबला होता, त्याला पाठीमागून एका एम एच 12 या पुणे पासिंग असलेल्या ईनोवा कारने जोराची धडक दिली या भीषण अपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाले असल्याची माहिती मिळत आहे. कारची धडक इतकी जोरदार होती की अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे, कारचा चालक बसणारा दर्शनी भाग थेट ट्रकच्या खाली गेला आहे. क्रेन लावून कारला बाहेर ओढले जात आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ही मदत कार्य सुरू आहे. काही जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही. दरम्यान इनोवा कार मधून सर्वजण सांगोला मार्गे बिदर कडे जात होते अशी माहिती मिळत आहे. मयतामध्ये दोन महिला, एक पुरुष आणि एक लहान बाळाचा समावेश असल्याचे सिविल हॉस्पिटल मधून समजले.
























