सोलापूर : तू आमच्याविरोधात गेलास तर तलवारीने तुकडे तुकडे करीन आणि फेकून देईन अशी धमकी देत, एकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक सुनील कामाटी सह सात जणांविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हकीकत अशी की ही मारहाण 9 एप्रिल रोजी रात्री झाली आकाश चव्हाण, नगरसेवक सुनील कामाटी, गणेश कामाटी, शिवा कामाटी, आकाश कामाटी, महेश पवार, मनोज बनसोडे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत,
संजय काशिनाथ आडगळे वय 39 राहणार भगवान नगर पोलीस मुख्यालय शेजारी सोलापूर हे राम जाधव यांच्या वाढदिवसा साठी मुराजी पेठेतील सूर्य हॉटेल च्या पाठीमागे असलेल्या कांचन गॅरेज मध्ये गेले होते, तिथे सर्व जण आले शुभेच्छा दिल्या नंतर सर्व जण संजय आडगळे यांच्याजवळ आले त्यातील एकाने तू आमच्या पप्पाला सोडून दुसऱ्या पार्टीत गेलास आता तुला सोडत नाही, तुझा गेमच करतो असे म्हणत बाहेर चल असे म्हणाला संजय आडगळे यांनी सर्वांची नजर चुकवून तिथून घरी निघाले, तेव्हा अनोळखी दोन मोबाईल नंबर वरून आडगळे यांना फोन आला तू कुठे आहेस तुला आज सोडणार नाही अशी धमकी दिली, संजय आडगळे यांनी मी घराकडे आलो आहे तुम्ही कोण आहात मला फोन करू नका असे म्हणाले, भगवान नगर जवळ संजय आडगळे हे मित्र संदीप वाडेकर यांच्या सोबत बोलत थांबले होते काही वेळाने ते जवळ असलेल्या रिक्षात बसले, तेव्हा वरील सर्व जण आले व त्यांनी संज्या तू कुठे लपून बसला आहेस असे ओरडू लागले, आकाश चव्हाण यांनी संजय आडगळे यांना रिक्षात बसलेले पाहिले व बाहेर ओढून काढले, पडलेल्या मिठाने मारहाण केली सुनील कामाटी याने लाकडाने मारहाण केली सुनील कामाटी यांनी हातात तलवार घेऊन आमच्या विरोधात गेलास तर तुकडे करीन, अशी धमकी दिली असल्याची फिर्याद संजय आडगळे यांनी दिली आहे, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंताकेंदी हे करीत आहेत.

















