सोलापूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय वाचण्याच्या कारणावरून सुरेश पाटील यांनी आपला राग व्यक्त करत महापौरांच्या दिशेने भरसभेत पाण्याची बाटली भिरकावली, महापौर यंनम यांनी सुरेश पाटलांना निलंबित करत पोलिसांना त्यांना सभागृहा बाहेर काढण्याचे आदेश दिले .यामुळे भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी पालिकेची सर्वसाधारण सभा महापौर श्रीकांचन यंनम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होती सभेला सुरुवात होताच महापौरांनी रोलिंग दिल्याप्रमाणे नगरसचिव रवींद्र दंतकाळे हे विषय पत्रिकेवरील विषय वाचण्यास सुरुवात केली दरम्यान विषय पत्रिका वाचून झाल्यानंतर महापौरांनी रोलिंग दिल्यानंतर सुरेश पाटील यांनी संबंधित विषयावर बोलण्याचा हट्ट धरून बसले , मला बोलायच असताना आपण रोलिंग का दिला आज संविधान दिन आहे आज तरी कमीत कमी घटनात्मक पद्धतीने पालिकेच्या सभागृहाचे कामकाज चालू द्या असं म्हणून सुरेश पाटील यांनी आपल्या हातातील पाण्याची बाटली महापौरांच्या दिशेने फेकली ,सुरेश पाटील यांचे कृत्य हे निंदनीय आणि सभागृहाच्या संकेतला सोडून असल्याचे लक्षात येताच महापौरांनी पालिका आयुक्तांना पोलिसांना आदेश देऊन सुरेश पाटलांना बाहेर काढण्याचे आदेश दिले.
महापौरांच्या दिशेने बाटली फेकणे किंवा सागरात असंसदीय पद्धतीने वर्तन करणे हे निंदनीय असल्याचे सांगत विरोधी नगरसेवकांनी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला.
मागील वीस वर्षांपासून मी नगरसेवक म्हणून पालिकेच्या सभागृहात उपस्थित राहून कामकाजात सहभाग घेत आहे मी बाटली महापौरांच्या दिशेने फेकलं नाही असं म्हणत भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी सभागृहात घडलेल्या घटनेचा खुलासा केला
भाजपाच्या कार्यकाळातच पालिकेच्या महापौरांचा अवमान होणाऱ्या घटना बऱ्याच वेळा घडल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे


















