सोलापूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने डॉल्बी साऊंड सिस्टमला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे भीमसैनिकात संतापाचे वातावरण पसरले आहे. दोन बेस आणि दोन टॉपला परवानगी द्यावी यासाठी आंदोलनं सुरू आहे. अद्यापि त्यावर तोडगा निघालेला नाही. बुधवारी जयंती उत्सव विश्वस्त समिती तसेच बोधिसत्व मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने धरणे आंदोलन आणि रास्ता रोको करण्यात आले मात्र पोलीस प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आता शुक्रवार सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा शुक्रवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे जाईल. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, (पार्क)येथून निघणारआहे. तरी सर्व भिम सैनिकांनी,आंबेडकर अनुयायांनी, आंबेडकरी चळवळीतील नेते, पुढारी, सामाजिक संस्था, मंडळ, ग्रुप, प्रमुख नेते, प्रमुख युवा नेते, युवा संघटक, महिला मंडळ, युवक व युवती, या सर्वांना व सर्व समाज बांधवांनी या विराट मोर्चा मध्ये सामील व्हावे असे आवाहन जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


















