सोलापुर बार असोसिएशनच्या चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्ष पदावर सुरेश गायकवाड यांनी बाजी मारली. गेल्या वर्षी झालेल्या पराभवाचा वचपा त्यांनी या निवडणुकीत काढला. या निवडणुकीत विधी विकास पॅनलचे बांगी, भोसले व काळे हे विजयी झाले. अध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र फताटे व सह सचिव शाहीन शेख यांचा पराभव झाला. विधी सेवा पॅनलमधील अध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश गायकवाड व अनिता रणशृंगारे यांचा विजय झाला.
अध्यक्ष सुरेश गायकवाड 210 मतानी विजयी झाले, उपाध्यक्ष पदी बांगी आसिम 178 मतानी, सचिव पदी भोसले करण 247 मतांनी खजिनदार काळे अविनाश 12 मतांनी तर
सहसचिव रणशृंगारे अनिता 17 मतांनी विजयी झाल्या.
या निवडणुकीसाठी 1212 सभासदांनी मतदान केले होते सहाला सुरू झालेली मतमोजणी रात्री साडे अकरा वाजता संपून निकाल घोषित करण्यात आला.
अध्यक्ष
गायकवाड सुरेश =700
फताटे राजेंद्र =490
उपाध्यक्ष
बांगी आसिम =686
म्हेत्रे सिद्धाराम =508
सचिव
भोसले करण =591
देशमुख अभिजित =334
पाटील लक्ष्मण =267
खजिनदार
आगनुर =137
काळे अविनाश =368
कटारे विनय =356
शेख अब्दुल =302
सहसचिव
रणशृंगारे अनिता =547
शेख शाहीन =510
शिंदे सुवर्णा =158



















