Solapur : प्रभाग क्रमांक १७ लष्कर मधील अनेक महिन्यांपासून सत्तनाम चौक, गुलजार तालीम, कुंभार गल्ली, जांबमुनी चौक या विभागातील चार हातपंप बंद अवस्थेत होते.
याबाबत जांबमूनी मोची समाज अध्यक्ष करेप्पा जंगम, बंटी जंगम, मोची समाज माजी अध्यक्ष देविदास शागलोलु, मुस्लिम समाज अध्यक्ष अतुल पटेल या सर्व विभागातील कार्यकर्ते यांनी दलित पँथर यांच्या माध्यमातून महापालिका झोन क्रमांक ८ चे अधिकारी पेत्तार यांच्याकडे केली. दरम्यान २२ एप्रिल रोजी दलित पँथर सोलापूर जिल्हा अध्यक्ष बंडू गवळी यांनी समक्ष पत्र देऊन तक्रार सांगितली या तक्रारीची तातडीने दखल घेण्यात आली २३ एप्रिल रोजी सकाळी कर्मचारी येऊन काम चालू केले व विभागातील चेंबर भरलेले गाळ काढणे, हात पंप दुरुस्ती करणे ही कामे चालू झाली आहेत. दलित पँथरने अनेक महिन्यापासून चा प्रश्न सोडवला बद्दल नागरिकांनी अध्यक्ष बंडू गवळी यांचे आभार मानले.





















