सोलापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी अनेक वेळा त्यांचे दौरे रद्द झाले होते यांच्या उपस्थितीत सोलापुरात दोन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. रविवार 13 मार्च रोजी दुपारी पावणे दोन वाजता त्यांचे हेलिकॉप्टरने विमानतळावर आगमन होणार आहे त्यानंतर ते लगेच विजापूर रोडवरील नेहरूनगर इथल्या सुशीलकुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालय या ठिकाणी आयोजित भटक्या विमुक्त जाती जमाती किती मेळाव्यास उपस्थित राहतील.
दुपारी साडेतीन वाजता हेरिटेज लॉन येथे सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यास त्यांची उपस्थिती राहील. या त्यांच्या दौऱ्यात काँग्रेस भवनाला भेट नाहीच. यापूर्वी काँग्रेसचा कोणताही प्रमुख नेता आल्यास त्याची निश्चित काँग्रेस भवनाला भेट असते मात्र प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात काँग्रेस भवन वगळण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकात काँग्रेसची वाताहत झाली, या पार्श्वभूमीवर पटोले यांचा सोलापूर दौरा होत आहे.
















