सोलापूर- सोलापूर पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा अंतर्गत एमपीडीए कक्ष असून या कक्षामार्फत सोलापूर शहरांमधील सराईत गुंडांच्या टोळीत अवैध धंदे करणारे टोळी प्रमुख तसेच समाजकंटक प्रमुखांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्ती, अवैध वाळू उपसा करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यात बाबतचा अधिनियम 1981 च्या या कायद्यान्वये येरवडा कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात येते.
नागपूर शहर व पुणे शहर यांच्यानंतर तुलनेने लहान असलेले पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांची कामगिरी महाराष्ट्रात तिसर्या क्रमांकावर आहे. सदरच्या कारवाईमुळे सोलापूर शहर पोलिस दलातील प्रतिमा उंचावली असून एम पी डी एस अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोलापूर शहराच्या शांतता व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोणतीही गुंडागर्दी खपवून न घेता पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय करणारे सराईत गुंड समाजविघातक कृत्य करणारे यांची यादी तयार करण्यात आली असून सन 2022 मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमपीडीए कायद्यान्वये अशीच कारवाई चालू राहणार आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.


















