सोलापूर : हरिभाई देवकरण प्रशालेच्या मागील बाजूस रेल्वे लाईन हार्ट लाईन कंपौंड आहे इथे साधारण तीनशे कुटुंब वास्तव्यास आहेत. मोकळ्या मैदानावर पत्र्याचे शेड बांधून ही लोकं राहत आहेत मोकळ्या जागेचा ताबा हा ट्रस्टकडे आहे. दरम्यान इथे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ड्रेनेजलाईन तसच पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे हार्ट लाईन कंपौंड नजीक सुविधा निर्माण करून देण्यात आल्यानं पालिकेने इथून करासाठी प्रयत्न सुरू केले ट्रस्टच्या जागेत राहणाऱ्या लोकांची नोंद घेण्याचं काम सुरू झालं.
इकडे वास्तव्यास असणाऱ्या लोकांमध्ये गोंधळाच वातावरण तयार झालं, कुणी तरी आपली जागा बळकावू पाहतय असा समज निर्माण झाला. ट्रस्टच्या लोकांकडे हे रहिवासी गेले मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर इथल्या नागरिकांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्याकडे दाद मागितली फुलारे यांनी सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांना बोलावून घेत रहिवाशांनाही एकत्रित येण्यास सांगितल.
यानंतर नगरसेविका श्रीदेवी फुलारे या हार्ट लाईन कंपौंड इथं पोहोचल्या इथल्या अन्य रहिवाशांशी त्यांनी संवाद साधला सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांच्याशी चर्चा करून त्यांनी नागरिकांना खरा विषय पटवून दिला, पालिका या भागात सुविधा निर्माण करून देत आहे याबदल्यात उत्पन्न म्हणून कर भरणा व्हावा यासाठी भोगवटदार यांची नोंद करण्यात येत आहे. यातून पालिकेत पैसा जाईल कोणीही आपल्या घराचा ताबा घेत नाहीय, कोणीही ही जागा कोणाला विकत नाहीय, कोणीही तुम्हाला हुसकावून लावणार नाही असा मुद्दा पटवून देण्यात आला यानंतर इथल्या लोकांनी पालिका अधिकारी कर्मचाऱ्यास सहकार्य केल अशा प्रकारे नागरिकांच समाधान झालं आणि पालिकेच्या उत्पन्नाचा मार्ग मोकळा झाला.
इकडे सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांनी पालिकेकडून चाललेल्या कार्यवाहिवरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचं म्हटलं…..
दरम्यान हरिभाई देवकरण प्रशाले मागील या हार्ट लाईन कंपौंड मधील नागरिकांनी नळ जोडणी,लाईट,शौचालय भिंत आदी मागण्या यावेळी केल्या या सर्व प्रश्नांची निश्चित सोडवणूक होईल अशी ग्वाही देत पालिका प्रशासनास कराचा भरणा करून लोकांनी सहकार्य करावं असं आवाहन यावेळी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी केलं……


















