सोलापूर : मराठा समाजाचे नेते दास शेळके यांनी आसरा चौकात मध्यभागी येऊन गो बॅक कोशारी अशी घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकातून बाजूला हटवले. तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना या आंदोलनाला अल्प प्रतिसाद पाहता काही अवैध धंदेवाल्या लोकांनी जाणीवपूर्वक पोलिसांना मदत करून मोर्चामध्ये येणे टाळले असा आरोप केला. मैदानात डरकाळी आणि पोलिसांसमोर म्याव म्याव असे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
















