सोलापूर : सोलापूर तुळजापूर महामार्गावर कासेगाव येथील इजरा पेट्रोल पंपाजवळ दोन मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत चौघे जण जखमी झाले त्यात एकाचा उपचाराला आणता वेळी मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडला.
जखमी सुधीर राऊत व दिनेश भोजने राहणार सिंदफळ तालुका तुळजापूर व समाधान दंडवते व प्रमोद कोंडीबा मिटकरी राहणार हिंगणगाव तालुका सांगली तुळजापूर शिवसेना उपतालुका प्रमुख प्रदीप मगर यांनी ॲम्बुलन्स बोलावून तातडीने उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलकडे पाठवले. त्यात तिघांचे प्राण वाचले परन्तु सुधीर राऊत हे हॉस्पिटल मध्ये गेल्यावर उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मोटर सायकल mh25 ए एफ 42 70 व एम एच 13 बी एच 7101 या समोरा समोर धडकलेल्या दुचाकी गाडीचे नंबर आहेत. अपघात झाल्यावर
घटनास्थळी बऱ्याच नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली होती प्रत्यक्ष जखमीं जवळ कोणी यायला तयार नव्हते. परंतु प्रदीप मगर यांनी जखमींना ताबडतोब अंबुलन्स बोलावून सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवले.
अंबुलन्स चालक सागर लोंढे यांनी केवळ पंधरा मिनिटात सिव्हील हॉस्पिटलमध्ये जखमींना पोहोच केले. त्याबद्दल सागर लोंढे यांचे प्रदीप मगर यांनी आभार मानले. सोलापूर तुळजापूर मार्गावर रॉंग साईडने येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. हा बळी रॉंग साईडचा आहे. हगलुर उळे कासेगाव भागात दगडखाणी असल्याने बरीच जड वाहने रॉंग साईडने येतात त्याचा दुचाकीस्वारांना नाहक त्रास होतो याची महामार्ग पोलिसांनी दखल घेणे गरजेचे आहे.
















