सोलापूर : जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे अनेक घोटाळे बाहेर येत राहतात त्यामुळे या विभागाच्या कामकाजावर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. आता तर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पदावरून मुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचारी सेवेत कसा असा प्रश्न उपस्थित करत त्याला मानधन संरक्षण करून कोणत्या आधारे नियुक्ती दिली असे ताशेरे राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईचे सहसंचालक संजय सरवदे यांनी ओढले आहेत.सहसंचालक संजय सरवदे यांनी आरोग्य सेवा पुणे उपसंचालकांना पत्र काढून याबाबत अहवाल मागवला आहे.
या पत्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंञाटी सेवेतून कार्यमुक्त करण्यात आलेले नागेश चौधरी यांना सेवेतून कमी करणेबाबतच्या प्राप्त तक्रारीवावत. असा विषय आहे. या पत्रात म्हटले आहे की,
जावेद लाल पटेल, महासचिव, वंचित बहुजन आघाडी, जिल्हा सोलापूर यांचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले होते. प्राप्त पत्रामध्ये सोलापूर जिल्हयात जिल्हास्तरावर अभियानांतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर पदावर कार्यरत श्री. नागेश चौधरी यांना आपल्या पदावरून कार्यमुक्त केल्यानंतर त्यांना पुनःश्च डाटा एन्ट्री पदावर तब्बल एक माहिन्यानंतर मानधन संरक्षण करुन कोणत्या आधारे नियुक्ती दिली असल्याचे मुद्दे उपस्थित केले होते. त्यास अनुसरुन संदर्भ क्र. २ अन्वये जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर यांचा अहवाल व प्रकरणाची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली होती. प्राप्त अहवालाचे अवलोकन केले असता श्री. नागेश चौधरी यांना कोणत्या आधारे मानधन संरक्षण करून नियुक्ती दिली याचा बोध होत नसून नियुक्ती संशयास्पद दिसून येत असल्याने संदर्भ क्र. ३ अन्वये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आपणास निर्देशित करण्यात येते की सदर प्रकरणाची सर्वकष फेरचौकशी करून त्यावायतचा अहवाल आवश्यक दस्ताऐवज व जावजवाबासह तसेच आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह या कार्यालयास त्वरीत सादर करण्यात यावा.
आता राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कोट्यवधीचा निधी एकाच बँकेत ठेवून त्यांच्या कमिशनवर कोण डल्ला मारतय?, हे किती वर्षांपासून सुरू आहे. एकच बँक का?त्याचे कारण काय?याची पोलखोल लवकरच ‘सिंहासन’च्या माध्यमातून होणार आहे.

















