सोलापूर : महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांची पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी प्रमोशनपर बदली झाली आहे. पांडे यांच्या सोबत महापालिकेचे वित्त व लेखा अधिकारी शिरीषकुमार धनवे यांचीही सांगली महानगरपालिकेत बदली झाली आहे तसेच ट्रेझरी शाखेच्या वित्त अधिकारी रूपाली कोळी यांची सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य लेखा परीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
यासोबत विशाल पवार यांची अहमदनगर महापालिकेच्या मुख्य लेखाधिकारी पदावर बदली झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी अजयसिंह पवार यांनी या बदली प्रित्यर्थ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता.
विशेष म्हणजे दिलीप स्वामी व धनराज पांडे हे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील आहे. अतिशय कौटुंबिक संबंध असल्याने धनराज पांडे यांचा सत्कार करताना दिलीप स्वामी यांच्यासह पांडे सुद्धा भावुक झाले होते, एवढ्या लवकर तुझा सत्कार करण्याची वेळ येईल असे वाटले नाही अशा भावनिक शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पांडे यांना सत्कार यावेळी जांभळाचे रोप देण्यात आले पालघर जिल्हा चिक्कू या फळासाठी प्रसिद्ध आहे, आता मी पालघर जिल्ह्यात जांभळाची लागवड करतो असे मजेशीरपने पांडे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी अजयसिंह पवार, उपमुख्य लेखा अधिकारी सुर्वे, लेखाधिकारी कैलास कुंभार, संजय आंबोले, मदन पोलके, परशुराम कोकणे यांच्यासह इतर पत्रकार उपस्थित होते.


















