सोलापूर : 6 जून शिवस्वराज्य दिनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यालयात सोलापुरातील छत्रपती ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी दिलीप स्वामी यांनी प्रतिमा स्वीकारली त्यानंतर त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ही प्रतिमा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात लावावी यासाठी छत्रपती ग्रुपने ही प्रतिमा दिल्याचे सांगण्यात आले.
यावेळी छत्रपती ग्रुपचे प्रमुख मनोज शिंदे, हरी चव्हाण, पप्पू गारे, रवी शिंगाडे, विशाल मोरे, वैभव शेळवणे, सागर शिंदे, भुजंग पुजारी, गिरीश पोतदार यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.