सोलापूर : 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, मुख्य लेखा वित्त अधिकारी अजयसिंग पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे, किरण सूर्यवंशी आदी अधिकाऱ्यांसह मराठा सेवा संघ अध्यक्ष अविनाश गोडसे व जिल्हा परिषद महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी डॉक्टर सुपाते यांनी महिला आरोग्य व आजच्या घडीला महिलांना येणार ताण याचे व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. सुलभा वठारे यांनी महिलांना प्रेरणादायी कवितेचे वाचन करून प्रोत्साहन दिले.
सर्वप्रथम जावेद शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका या त्यांच्या घरी माता, मुलगी, बहीण, आई इत्यादी विविध आघाडी सांभाळत अंगणवाडी सेवेत देत असलेल्या योगदानाबाबत अभिवादन केले. यावेळी मराठा सेवा संघ यांचे मार्फत 100 महिलांना लकी ड्रॉ द्वारे भेटवस्तूचे वितरण उपक्रम राबविला.
तसेच याप्रसंगी नवोपक्रम मध्ये उल्लेखनीय कार्य केलेबाबत अंगणवाडी सेविका राशिदा शेख व गोष्टी ताराच्या या लघुपटाद्वारे अंगणवाडी सेविका शीतल दुसाने यांचा सन्मान करणेत आला. यावेळी कार्यकारी अभियंता कुलकर्णी, खराडे तसेच महिला कर्मचारी साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी येडवे, बिदरकर या जोडीने अंगणवाडीच्या सेवांबाबत नाटिकाद्वारे प्रबोधन व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी सुहास गुरव यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी करणेबाबत नियोजन कक्ष अधिकारी चंद्रकांत होळकर, अधीक्षक गिरीश जाधव, विस्तार अधिकारी श्रीकांत मेहेरकर, सहायक गणेश साळुंखे, सचिन आंबेकर यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी पोषण पंधरवडा अंतर्गत पोषण प्रतिज्ञेने करून उपस्थितांचे आभार मानले.


















