महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या उपाध्यक्ष पदावर आनंद साठे यांची निवड करणेत आली.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे मूळ सेवा पुस्तकांच्या प्रती ऑनलाईन मिळवून देणेसाठी क्यू आर कोड तयार करणारे, कुर्डुवाडी पंचायत समिती चे लिपीक आनंद साठे यांची महासंघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड करणेत आली.
सदर निवड महासंघाचे राजेश देशपांडे, रमेश कोळी, दिनेश बनसोडे, सचिन मायनाळ, यशवंत वलेकर, हनुमंत भोसले, सुरेश राठोड, आर सी लोखंडे, आकाश बडवे, अनिल गुंड,प्रमोद धावड दीपक वाघमारे, अमोल धाकपाडे, यांच्या उपस्थित करणेत आली.
महासंघाचे राज्य अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, सरचिटणीस संजय महालंकर, विभागीय सह सचिव रमाकांत साळुंखे, ग्रामसेवक युनियन चे शरद भुजबळ, डी एम पाटील, विस्तार अधिकारी संघटनेचे संदीप खरबस, लिपीक वर्गीय संघटनेचे पांडुरंग कविटकर, तजमूल मुतवल्ली, सचिन सोनकांबळे, संतोष शर्मा, विजय कुलकर्णी, सागर शेंडगे, आरोग्य कर्मचारी युनियन चे निर्मल पवार, पवार, विष्णू सानेपागुल, हनुमंत कोळी नर्सेस संघटनेचे सुनंदा सुरवसे, सुरेखा जवळकर, कृषी तांत्रिक संघटनेचे सचिन चव्हाण, लेखा संघटनेचे गुरुनाथ जाधव, अनंत माने, रवि लिगाडे, महेश भोसले, जमीर शेख, मैल मजूर संघटनेचे कानिफनाथ चव्हाण, पांडुरंग शिंदे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


















