सोलापूर : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. या निवडणुकीत माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या पॅनलने विजय संपादन केला. हा जल्लोष सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारात साजरा करण्यात आला.
दत्तात्रय सावंत हे मिरवणुकीने जिल्हा परिषदेत आले, यावेळी हलग्यांचा कडकडाट झाला, मुक्त गुलालाची उधळण होऊन जिल्हा परिषदेच्या आवारातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फोटोसेशन करून ही मिरवणूक पुढे रवाना झाली.



















