सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील गट विकास अधिकारी (एस-२०) संवर्गातील 72 अधिकाऱ्यांना उप मुख्य कार्यकारी अधिकारी (एस-२३) संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील यांची एक वर्षाच्या आतच बदली चंद्रपूर पंचायत समिती गटविकास अधिकारी पदी बदली झाली आहे.
त्याच बरोबर मोहोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी जी मोरे धुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी पदोन्नतीने बदली झाली आहे. याच बरोबर माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस ए खरात यांची अहमदनगर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी पदोन्नती झाली आहे.
दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी कोल्हापूर अजरा पंचायत समितीचे बीडीओ बी डी वाघ यांची बदली झाली आहे. बार्शी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी सातारा खंडाळा पंचायत समितीचे बीडीओ एम के बिचुकले यांची नियुक्ती झाली आहे. जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील यांचे पती धैर्यशील पाटील हे सोलापूरचे उपवनसंरक्षक असल्याने त्या चंद्रपूरला जाण्याची शक्यता कमी असल्याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे.

















