सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये पंचायत राज समितीचा दौरा अखेर पार पडला. शुक्रवारी तिसऱ्या दिवशी समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर, आमदार विक्रम काळे यांनी पत्रकार परिषद घेतली. या समितीच्या दौऱ्या दरम्यान जिल्हा परिषदेतील काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या तक्रारी निवेदन स्वरूपात समिती सदस्यांकडे प्राप्त झाल्या होत्या.
दरम्यान समाज कल्याण विभागातील दलित वस्ती योजनेच्या टक्केवारीचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी प्रश्न उपस्थित केल्याने त्या संदर्भात सर्व माध्यमांमध्ये बातम्या छापून आल्या. या विषयी पत्रकारांनी समितीच्या अध्यक्षांना प्रश्न विचारले. मागील तीन दिवसांमध्ये जिल्हा परिषदेच्या या संदर्भात जितक्या बातम्या छापून आल्या त्या सर्व बातम्यांची दखल पंचायत समितीने घेतली आहे.
प्रामुख्याने ज्या अधिकारांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांची बदली करावी अशी मागणी आहे. तो अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नाही परंतु त्या अधिकार्यांवर निश्चित कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असून या विषयी संबंधित विभागाच्या सचिवाची सुनावणी पंचायत राज समिती लावणार आहे अशी माहिती अध्यक्ष रायमुलकर व आमदार विक्रम काळे यांनी दिली. पहा काय म्हणाले अध्यक्ष रायमूलकर व आमदार काळे…..

















