सोलापूर : जिल्हा परिषद जलजीवन मिशन योजनेत झालेल्या अनियमिततेसोबत आता बरीच प्रकरणे बाहेर पडत आहेत. इंजिनिअर मामा-भाच्यानी मिळून बनवाबनवी केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा कारंडे यांनी नुकताच कुलकर्णी समितीच्या आलेल्या अहवालावर तीव्र अशी नाराजी व्यक्त केली. हा अहवाल म्हणजे जिल्हा परिषदेची बनवेगिरी असल्याचा आरोप करत आता या प्रकरणाची राज्यस्तरीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली.
सोलापूर जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांना सुवर्णपदकच शासनाने दिले पाहिजे, कारण जे देशात घडले नाही असा पराक्रम जिल्हा परिषदेने केला आहे. ग्रामीण पुरवठा विभाग सोलापूरच्या अधिपत्याखाली सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून नोंदणी असणारे अमर कांबळे नामक ठेकेदार यांची पाणीपुरवठ्याची कामे चालू आहेत याच इसमाने कॉन्ट्रॅक्ट स्थापनेवरील अभियंता म्हणून सुमारे नऊ कोटींची देयके मोजमाप नोंदवहीत नोंदवले आहेत आणि त्यादेयकांचे धनादेश एजन्सीला अदा झाले आहेत हा गुन्हा फौजदारी स्वरूपाचा आहे आणि गुन्हा दाखल झालाच पाहिजे. दरम्यान कारंडे काय म्हणाले पहा ..

















