सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात बचत गट समुहातील महिलांना पंतप्रधान विमा संरक्षण देणेत येणार आहे. महिलांकडून अर्ज भरून घेणेचे सुचना जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या.
भारत की आजादी का अमृत महोत्सव महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने हॉटेल सूर्या येथे जिल्हास्तरीय बँकर्स कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी संतोष धोत्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार , जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, नाबार्ड बँकेचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके, जिल्हा अभियान व्यवस्थापक मीनाक्षी मडवळी वितीय सल्लागार गोरख कांबळे, आर्थिक समावेशन सल्लगार भालचंद्र भालेराव हे उपस्थित होते.
या कार्यशाळे मध्ये सिईओ दिलीप स्वामी यांनी उमेद अभियान समूहांना वितरित करण्यात येणारे बँक कर्जाचे उदिष्ठ्य जानेवारी 2021 पर्यंत 100 टक्के पूर्ण करणेचे सूचना दिल्या.
या प्रसंगी सर्व बँकांचा आढावा घेतला आणि उमेद कर्मचारी व बँक अधिकारी यांनी एकमेकांशी समनवय साधून सूक्ष्म नियोजन व त्यावर अंमलबजावणी करावी,
जे तालुके उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत अशा उमेद कर्मचारी यांचे वर प्रशासकीय कारवाई करणेत येईल अशा स्पष्ट सुचना सिईओ दिलीप स्वामी यांनी दिले.
जिल्ह्यात बचतगट समूहातील महिलांना पंतप्रधान विमा सरंक्षण देणे साठी त्यांचे अर्ज भरून घ्यावे, असे सूचना दिले. उत्कृष्ट काम केलेल्या बँकर्स चे अभिनंदन केले.
तसेच समूहाचे, ग्रामसंघाचे, समूहांतील महिलांचे बँक खाते उघडणे बाबत बँकांनी तात्काळ कार्यवाही पूर्ण करावी अशा सूचना बँक व उमेद कर्मचारी यांना प्रस्ताव वेळेत सादर करणे चे सूचित केले.
बँकर्स कार्यशाळे प्रसंगी.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी उमेद अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली, व बँकांचा बँक निहाय आढावा घेतला. कामचुकार कर्मचारी यांचे वर कारवाई करणार असल्याचे सांगून कमी काम असलेल्या तालुक्या बाबत नाराजी व्यक्त केली.
तसेच मीनाक्षी मडवली जिल्हा अभियान व्यवस्थापक यांनी यांनी मागील तीन वर्षात कसे सहकार्य केले कर्ज परतफेडीबाबत जागर मोहिमेबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमा करिता लेखाधिकारी कैलास कुंभार, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, जिल्हा व्यवस्थापक दत्तात्रय सोट,व जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, शीतल म्हता, नदाफ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकचे तसेच उमेद अभियानाचे जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन रवींद्र भोसले केले व भगवान कोरे यांनी आभार मानले.

















