सोलापूर- उमेद अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेने सन 2022-23 या आर्थिक वर्षात उत्कृष्ठ काम करून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
सामाजिक समावेशन, संस्थिय बांधणी, क्षमता बांधणी, उपजीविका, मार्केटिंग, सर्व प्रकारची ट्रेनिंग, महिला बचत गटांना वेगवेगळ्या प्रकारचा निधी देणे, वेगवेगळ्या विभागाच्या योजना महिला यांना मिळण्यासाठी प्रयत्न करणे, स्मार्ट योजना तसेच रुक्मिणी रानभाज्या महोत्सव, रुक्मिणी दिवाळी महोत्सव इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या कामकाजात उल्लेखनीय काम केल्याबद्दल जिल्ह्यास राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. एकूण वेगवेगळ्या विषयाचे 100 मार्कचे रँकिंग करण्यात आले त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात 90.7 मार्क मिळाले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, व राज्य अभियान व्यवस्थापक (Mis &ME) तथा पालक अधिकारी सोलापूर नितीन हरचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कक्षातील माझे सर्व सहकारी लेखाधिकारी,सर्व जिल्हा व्यवस्थापक, लेखापाल,सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक व सर्व ग्रामस्तरावरील केडर यांचे अभिनंदन करणेत आले आहे.जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक राहूल जाधव, संतोष डोंबे, मिनाक्षी मडीवळी, दयानंद सरवळे, अमोल गलांडे, यांनी चांगले नियोजन केले आहे. प्रभावी अंमलबजावणी साठी प्रयत्न केले आहेत.
बचतगटांना 272 कोटी बँक कर्ज वाटप- सिईओ दिलीप स्वामी
……………….
महिला बचत गट यांचे बँक कर्जाचे उदिष्ट 212 कोटी होते परंतू एकूण 272 कोटी बँक कर्ज वाटप करणेत आले असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. महिलांची दुध डेअरी हा देखील विशेष उपक्रम राबविला असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. सर्वांनी झटून काम केले. सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करीत असलेल्यांचा सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.



















