सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी एकादशीची प्रशासनाची लगबग सुरू झाली असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे दोन प्रमुख अधिकारी रोजच्या रोज वारीच्या तयारीचा आढावा घेत आहेत.
जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या वारीमध्ये महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने 124 ठिकाणी औषधोपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. 77 ठिकाणी कोविड टेस्टिंग सेंटर तसेच 83 केंद्रावर लसीकरण होणार आहे. वारकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास 54 ठिकाणी विलगीकरण कक्ष करण्यात येणार आहेत.
स्तनदा मातांसाठी माता-बालक कक्ष 67 ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. पालखीचा विसावा आणि मुक्काम ज्या ठिकाणी आहेत अशा बावीस गावांमध्ये महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली…

















