सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती पंचायत समितीचे सर्व सभापती यांना मुदतवाढ मिळाल्याची अफवा पसरली या आपले मागे एक कारण म्हणजे ग्रामविकास विभागाने आठ जुलै रोजी एक पत्र काढले त्या पत्रामध्ये सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना करण्यात आले आहेत.
या पत्रात
विषय :- जिल्हा परिषद अध्यक्ष/ उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती/ उपसभापती यांच्या निवडणूक कार्यक्रमास स्थगिती देण्याबाबत
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या कार्यकाळाशी संबंधित महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे
तथापि उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता, मला आपणास असे कळविण्याचे निर्देश आहेत की आपल्या जिल्हयातील प्रस्तावित असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष/ उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती/ उपसभापती यांच्या निवडणूक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत तात्काळ स्थगिती देण्यात यावी. तसेच ज्याठीकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष / उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती / उपसभापती यांचा विहित मुदतीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे त्याठीकाणी विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष / उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती / उपसभापती हे पुर्ववत प्रमाणे कार्यकाल सांभाळतील.
या पत्राने खळबळ माजली. सोलापूर जिल्हा परिषदेमधील सर्वच पदाधिकाऱ्यांना पुन्हा पदभार मिळणार परंतु याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्याशी याप्रकरणी विचारणा केली असता, राज्यांमध्ये आणखी पाच ते सहा जिल्हा परिषद अशा आहेत की त्यांची बॉडी अस्तित्वात आहे. त्यांचे इलेक्शन लागले नाही. केवळ 25 जिल्हा परिषदांचे इलेक्शन लागले आहे. त्यामुळे हे पत्र आपल्यासाठी लागू होत नाही ते ज्या जिल्हा परिषदांची बॉडी अस्तित्वात आहे त्यांनाच लागू पडेल अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे कोणी अफवा पसरू नये असे आवाहन केले.



















