शुक्रवार 21 ऑक्टोबर रोजी रात्री बारापर्यंत शनिवारी, रविवार सुट्टी दिवसभर थांबून जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, सण अग्रीम, नियमित वेतन, शासन सूचनेनुसार वेळेवर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने मुख्य लेखा वित्ताधिकारी अजयसिंह पवार, लेखाधिकारी कैलास कुंभार, सहाय्यक लेखाधिकारी दत्तात्रय घोडके, वेतन प्रणाली राबविणारे गुंडूराज कारंडे, प्रफुल्ल रणदिवे, विलास मसलक, योगेश हब्बू, बोरकर आदींचा सन्मान उपसंचालक प्रशासन लेखा व कोषागार बी एम पाटील यांच्या हस्ते रोप देऊन करण्यात आला.
याप्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी तमाम जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने वेळेत वेतन केल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी डॉ.एस. पी. माने, राजीव गाडेकर, तजमुल मुतवली, राकेश सोडी, श्रीशैल देशमुख, अमित सलगर, देविदास म्हेत्रे, कैलास जींदे, राजशेखर कमले आदी उपस्थित होते.




















