सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे मागील काही दिवसांपासून ॲक्शन मोडवर आहेत त्यांनी आता जिल्हा परिषद आवारात वाहने लावण्यासाठी पे अँड पार्क करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच कार्यालय सोडून जिल्हा परिषद आवारात फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ही आता लक्ष ठेवणार असल्याचा इशारा स्वामी यांनी दिला.
दरम्यान जिल्हा परिषद / पंचायत समितीच्या विविध विभागामध्ये अनेक प्रकारचे कामे सातत्याने चालत असतात. विविध योजना, आस्थापना बाबी, प्रचलित सातत्याने चालणारे कामे हे सदैव सुरु असतात. सदर कामे पारदर्शक व गतीमान व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करुन ही बरीच कामे वेळेवर होत नाहीत. प्रलंबितता वाढते. प्रशासकीय कारणामुळेही काही वेळा कामे प्रलंबित राहतात. त्यामुळे लोकाची नाराजी होते, त्यातून लोक प्रतिनिधींची नाराजी नाराजी होते. जिल्हा परिषद प्रशासनाही नाहक बदनामी होते. काही वेळेला गैरमार्गाने कामे केल्या किंवा काही विशिष्ट हेतू ठेऊन नस्ती प्रलंबित ठेवण्याच्या तक्रारी येत असतात.
त्यास्तव झिरो प्रलंबितता करणे अत्यावश्यक आहे, त्यासाठी सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी या सर्वानी पुढाकार घेऊन याबाबतीत सर्व प्रलंबितता शून्यावर आणणेसाठी हा उपक्रम घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पारदर्शक, गतीमान व संवेदनशील प्रशासन होण्यासाठी तसेच नागरीकांच्या मनात जिल्हा परिषद प्रशासनाबाबत सकारात्मकता निर्माण होण्यासाठी ” प्रलंबितता निपटारा मोहीम विशेष कॅम्पचे आयोजन ” हा उपक्रम हाती घेण्याची गरज निर्माण झाल्याने अशा प्रकारे कॅम्प घेणे आवश्यक असल्याने पुढीलप्रमाणे कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात येत आहे.
*अशी चालणार मोहीम.*
झिरो प्रलंबितता निर्माण करण्यासाठी १० नोव्हेंबर ही तारीख निश्चित करुन ह्या तारखेपर्यंतच्या सर्व तक्रारी / अर्ज/निवेदन/ मागणी नियमानुरुप निकाली काढण्यात याव्यात.
दिनांक १६, १७ व १८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी जिल्हा परिषद / पंचायत समिती कार्यालयात
प्रत्येक विभागात विशेष कॅम्पचे आयोजन सर्व विभाग प्रमुख / गटविकास अधिकारी यांनी करावे.
दिनांक १४ व १५ नोव्हेंबर २०२२ या दोन्ही दिवशी प्रत्येक कक्षाकडे काय-काय प्रलंबितता आहे याची यादी तयार झाली आहे.
सदर कार्यक्रमाला व्यापक प्रसिध्दी देऊन संबंधित तक्रारदार / निवेदनकर्ते यानाही प्रसिध्दीद्वारे माहिती द्यावी.
ज्या कार्याला नियमानुरुप वेळ लागतो जसे पदोन्नती, इतर चौकशी, न्यायालयीन विषय याची यादी तयार करुन त्याचा कालबध्द वेळापत्रक या दिवशी जाहीर करावे..
*इतर सुचना*
★जे कामे तात्काळ होण्याजोगे आहेत ती त्याच दिवशी पूर्ण करुन नस्ती निकाली काढाव्यात व त्याच्या नोंदी घ्याव्यात.
प्रत्येक विभाग व पंचायत समिती कार्यालयाने कोणताही विषय / तक्रार / निवेदन प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी..
ग्रामपंचायत / पंचायत समिती स्तरावरील कॅम्पचे अवलोकन / पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरुन अधिकारी नियुक्त केले जातील.
सदर कॅम्प हे फक्त कार्यालयीन पुरतेच मर्यादिन न ठेवता लोकप्रतिनिधी, पत्रकार, नागरीक यांनाही सोबत घ्यावे, त्यांच्या सूचना याची नोंद घ्यावी.
आस्थापना विषयक तक्रारी मोठ्या प्रमाणात असतात त्या सर्व निकाली काढाव्यात.
कामाच्या / कर्मचाऱ्याच्या तक्रारी प्रलंबित असल्यास त्या निकाली काढण्यासाठी कालबध्द
कार्यक्रम आखून सर्व संबंधिताना तसे अवगत करावे व पाठपुरावा करावा.



















