सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी पैसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना सोलापूर शाखेची बैठक सोमवारी यांच्या निधी कक्षात संपन्न झाली या बैठकीला संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय उपरे, जिल्हाध्यक्ष वाय पी कांबळे, जिल्हा सरचिटणीस समीर शेख, कार्याध्यक्ष संतोष मंडलिक, उपाध्यक्ष रोहिणी सुगंधी, राज्य संघटनेच्या विजया राऊत, संघटक गौतम खिलारी, मार्गदर्शक मिसबा शेख यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नती समुपदेशनाद्वारे करण्यात याव्या, नयना शिंदे यांच्यावर झालेले अन्यायकारक निलंबन त्वरित रद्द करण्यात यावे, जिप आरोग्य कर्मचारी हे कोवीड काळात एकही सुट्टी न घेता अविरतपणे देशावर आलेले संकट दूर करण्याचा प्रयत्न करत असून त्यांचे वेतन हे एक तारखेलाच व्हावे, या संघटनेच्या मागण्या आहेत.
बैठक सकारात्मक झाली त्यानंतर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय उपरे यांनी या बैठकीचे अधिक माहिती दिली……


















