सोलापूर – कोरोनाची दक्षता घेणे साठी पालखी मार्गावर विलगीकरण व तपासणी कक्ष उभारणेत येणार आहे. भाविकांचे सेवेसाठी शासकीय आदेशाची वाट पाहू नका असे भावनिक आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा परिषदेचे निजी कक्षात गटविकास अधिकारी व जिल्ह्यातील पाच पालखी मार्गावरील संबंधित अधिकारी व कर्मचारी व ग्रामसेवक यांची बैठक घेणेत आली. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
महिलासाठी स्वतंत्र शौचालय सुविधा
व माता बालक कक्ष
……………….
यात्रा कालावधीत महिलांची मोठी कुचंबना होते. महिला साठी स्वतंत्र शौचालय सुविघा करणेत येणार आहे. ८ हजार शौचालया मध्ये ५० टक्के शौचालये महिला साठी आरक्षित असणार आहेत, दर पाच किमीवर सुविघा देणेत येत आहेत. खाजगी, सार्वजनिक व भाडेततत्वावर घेणेत आलेली शौचालये देणेत येत आहेत. सुचना फलक लावणेत येत आहेत. माता बालक यांचे साठी कक्ष करणेत येत आहे. या साठी स्वतंत्र महिला अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करणेत येत असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
कचरा व्यवस्थापन साठी प्लास्टीक संकलन केंद्र
……………….
पालखी मार्गावर प्लास्टीक चा मोठ्या प्रमाणावर कचरा तयार होतो. हा कचरा रोखणे साठी स्वयंशिस्त असलेले वारकरी यांना प्रबोधन करून मार्गावर प्लास्टीक कचरा संकलन केंद्र तयार करणेत येत आहे. पत्रावळी, चहा व पाणी पिणेचे प्लास्टीक ग्लास, कप, पिशव्या, या मुळे मोठ्या प्रमाणावर प्लास्टीक कचरा तयार होते. हा कचरा रोखणे साठी व संकलनासाठी प्रबोधन करणेत येत आहे.
कचरा मुळे पालखी मार्गाची बकाल अवस्था होते. ठिकठिकाणी संकलन केंद्रे करणेत येत आहे. सहज वारकरी प्लास्टीक टाकतील याची काळजी घेणेत येत आहे. या साठी सुचना फलक लावणेत येत आहेत. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
पाचही प्रमुख पालखी मार्गावर वारकरी यांना सुविधा देण्याचे भावनिक आवाहन
……
पालखी मार्गावर वीज, पिण्याचा पाणी व आरोग्य सुविघा या मध्ये कुठलाही हालगर्जी पणा चालणार नाही. प्रत्येक कामात आदेशाची वाच पाहू नका. चांगल्या सुविघा द्या. थेट संपर्क करा. पावसाळ्याच्या दिवस असलेने काळजी घ्या असे भावनिक आवाहन केले.
कोविड सेंटर व तपासणी कक्ष
…………………..,..
आषाढी यात्रेत कुठल्याही प्रकारचा कोरोनाचा संसर्ग होऊ नये. या साठी सर्व स्वयंसेवक यांचे बुस्टर डोस ने लसीकरण व कर्मचारी व अधिकारी यांचे लसीकरण सक्तीचे आहे. लसकरण केलेले ओळखपत्र जवळ बाळगावे लागणार आहे. भाविकांनी कुठल्याही क्षणी कोविड चाचणी करणेसाठी तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यास विलगीकरण कक्ष देखील तयार करणेत येत आहे. आजार अंगावर काढू नका असे भावनिक आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. गर्दी लक्षात घेता प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवेकरी म्हणूनच काम पाहतील. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी रस्ते सुधारणा, मजबुतीकरण करणे बाबत सुचना दिल्या.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी शौचालय सुविघा च्या ठिकाणी सुचना फलक बसविणेते सुचना दिल्या. शौचालया साठी पुरेशी वीज अधिकृत घेऊन त्या ठिकाणी उजेड करणेचे सुचना दिले.

















