सोलापूर : जिल्हा परिषद कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांची प्रमोशन पर बदली झाली असून सांगली जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विवेक कुंभार यांनी जिल्हा परिषदेमध्ये दोन वर्षाहून अधिक काळ काम केले आहे. या कार्यकाळात जिल्हा परिषद कृषी विभागाकडे असलेले महत्त्वपूर्ण अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये चांगल्या पद्धतीने कामकाज केल्याचे पाहायला मिळाले. यासोबत सेस फंडातील डीबीटी योजनेत शंभर टक्के निधी खर्च होण्याबाबत त्यांनी कायम प्रयत्न केला आहे. त्यामुळे मागील त्यांच्या कार्यकाळात कृषी विभागाच्या कामकाजावर कोणीही ताशेरे ओढले नाहीत असे पाहायला मिळाले.
दरम्यान बुधवार पाच एप्रिल रोजी राज्याच्या कृषी विभागाने गट अ कृषी उपसंचालक संवर्गातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या संवर्गात पदोन्नती दिल्या आहेत. त्यात विवेक कुंभार यांना सांगली जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे.


















