सोलापूर – जिल्हयात जलजीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवा. लोकांना वेळेत पाणी द्या सोलापूर जिल्ह्यासाठी २०१ कोटी रूपयाचा आराखडा करणेत आला असल्याची माहिती राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रकल्प संचालक रविंद्र शिंदे यांनी केले.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, भुजल सर्वेक्षण व पाणी गुणवत्ता विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी, विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, भुजल सर्वेक्षण विभागाचे मुश्ताक शेख, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, गटविकास अधिकारी संताजी पाटील, गटविकास अधिकारी गणेश मोरे, गटविकास अधिकारी देशमुख प्रमुख उपस्थित होते.
जलजीवन मिशन लोकांचा प्राण – संचालक रविंद्र शिंदे
जलजीवन मिशन ही महत्वकांक्षी योजना आहे. १० टक्के लोकवर्गणी साठी लोकांमध्ये जागृती करा. पाणी पुरवठा योजना लोकांना आपली वाटली पाहिजे. लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. वैयक्तीक नळ कनेक्शन पुर्ण करा.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे वेळेत पुर्ण करा. सर्व कुटूंबाना वैयक्तीक शौचालयाचा लाभ द्या. ओडीएफ प्लस गावे करून शास्वत स्वच्छता ठेवणे साठी प्रयत्न करा. जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन च्या कामासाठी मनुष्य बळ देणेत येत आहे. हात धुणेची सोय शाळेत व अंगणवाडीत करा. शाळा व अंगणवाडीला नळ कनेक्शन द्या असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक गावांसाठी सार्वजनिक शौचालय – सिईओ दिलीप स्वामी
एकही व्यक्ती शौचालया साठी उघड्यावर जाणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येक गावांसाठी सार्वजनिक शौचालय उभारणेत येणार आहे. गटविकास अधिकारी यांना सार्वजनिक शौचालय मान्यतेचे अधिकार देणेत आले आहेत. सर्व कुटुंबांना शौचालय होणे साठी प्रयत्न करी असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
या वर्षातील कामे डिसेंबर पर्यंत पुर्ण न झाले कारवाईला तयार रहा असेही ठामपणे त्यांनी सांगितले. जलजीवन मिशन चे कामात कुचराई झालेली खपवून घेणार नाही असेही स्पष्ट पणे त्यांनी सांगितले. जिल्ह्याची मान खाली घालायला लावू नका.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी सांडपाणी व घन कचरा व्यवस्थाप न मध्ये रोजगार हमी योजनेचा कृती संगम करणेचे सुचना दिल्या. उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी १५ वा वित्त आयोगा मध्ये जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन साठी तरतुद करून ठेवा. अशा सुचना दिल्या.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी वैयक्तीक शौचालया साठी आधारकार्ड पाठविणेचे आवाहन केले.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


















