सोलापूर- जिल्ह्यातील किमान २५० शाळा मघ्ये केंद्र शासनाचा विद्याजली उपक्रम राबविणेत येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयास शाळा दत्तक देणार येणार आहेत. सोलापूर विद्यापीठाने विद्याजंली उपक्रम राबविणेसाठी आॅनलाईन कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस या होत्या. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी हे होते. Central government’s Vidyajali project will be implemented in at least 250 schools in the district. Schools will be adopted for every college in the district. Solapur University had organized an online workshop to implement Vidyajanli activities. The workshop was chaired by Dr. Punyashlok Ahilya Devi Holkar University Vice Chancellor. This was Mrinalini Fadnavis. Solapur Zilla Parishad CEO Dilip Swamy was the chief guest on this occasion.
या कार्यशाळेस प्र-कुलगुरू, डॉ. विकास पाटील, प्र. कुलसचिव डॉ. सुरेश पवार साधन व्यक्ती प्आंतर-विद्याशाखीय अभ्यास चे अधिष्ठाता डॉ. व्ही. पी. शिखरे, आर्टस अँड कॉमर्स महाविद्यालय, माढा.चे प्रा. डॉ. एस. पी. राजगुरू उपस्थित होते.
सोलापूर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. पी. शिखरे, आर्टस अँड कॉमर्स महाविद्यालय, माढा.चे प्रा. डॉ. एस. पी. राजगुरू यांनी विद्यांजली बाबत मार्गदर्शन केले.
सामाजिक जबाबदारी व समुदायाच्या सहाय्याने शाळांना पायाभूत सुविधा व गुणवत्ता वाढीचे दृष्टिकोनातून मजबूत करणे हा प्रमुख उद्देश्य असल्याचे डाॅ. राजगुरू यांनी सांगितले. येत्या १५ दिवसात शाळांची निवड करणेत येणार आहे.
स्वच्छ सुंदर शाळा च्या धर्तीवर विद्याजली उपक्रमास सहकार्य करू – सिईओ दिलीप स्वामी
शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षकांनी मनावर घेतले तर काय होऊ शकते याचा प्रत्यय स्वच्छ सुंदर शाळा मुळे आला आहे. त्याच धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व सोलापूर जिल्हा परिषद यांचे संयुक्त विद्यमाने विद्यांजलू उपक्रम यशस्वी करू.
जिल्हा परिषदेचे उपक्रमांत कुलगुरू फडणवीस यांचे योगदान आहे. महाविद्यालये शाळा दत्तक घेऊन त्या ठिकाणी कोविड मुळे जी मुले सघ्या घरी आहेत त्यांना मदत होईल. महाविद्यालयांना मदतीसाठी नोडल अधिकारी नेमणेत येणार आहेत. या बरोबर च नमामी चंद्रभागा साठी नदीकाठची गावे महाविद्यालयांनी दत्तक घेणे साठी विद्यापीठांत बैठक घेणे बाबत चर्चा करणेत आली.
प्राथमिक शाळांसाठी विद्यापीठ पुढाकार घेईल- कुलगुरू डाॅ. फडणवीस
सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयाचे नजीक असलेले किमान २ पेक्षा अधिक शाळा ११५ महाविदयालये दत्तक घेऊन त्या ठिकाणी मुला- मुलींचा आहार, गुणवत्ता वाढी साठी शैक्षणिक उपक्रम , आरोग्य विषयक मार्गर्दर्शन व सुविधा देणार आहे. स्वच्छ सुंदर शाळांत चांगले काम झाले आहे. सिईओ दिलीप स्वामी यांचे चांगले सहकार्य विद्यापीठास आहे. या निमित्ताने महाविद्यालयाचा सहभाग घेणार असल्याचे कुलगुरू डाॅ. फडणवीस यांनी सांगितले.


















