स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी राजे आणि दुसरे छत्रपती संभाजी राजे यांच्या जडणघडणीत राष्ट्रमाता जिजाऊ यांचे मोलाचे योगदान होते. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा वर्ग आणि त्या वर्गाचे अनुयायांनी अगदी स्वातंत्र्य काळापर्यंत केलेल्या पातकाचे अनेक दाखले देताना, राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांना दिलेल्या आरक्षणाला टिळकांचा विरोध होता, असे राजन जोगदंड यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले.
स्वराज्याचे शत्रू असलेल्या मोगलांनी छत्रपती संभाजी राजांची हत्या केली. त्यानंतर मोगलांची सत्ता येणे क्रमप्राप्त होते, मात्र संभाजी राजांच्या मृत्यूनंतर पेशवाई का आली, असा जोगदंड सर यांनी यावेळी उपस्थित केला.
तुळजापूर तालुक्यातील मौजे कुंभारी येथे बहुजन सोशल फाऊंडेशन आणि ग्रामस्थांच्या वतीने, बुधवारी १२ जानेवारी रोजी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ४२४ वा जन्मोत्सव, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेले निर्देशांचे पालन करीत साजरा करण्यात आला. तुळजापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ मराठा सेवा संघाचे सोलापूर शहराध्यक्ष सदाशिव पवार यांनी जिजाऊ वंदनेने झाला. त्यानंतर निमंत्रितांचं स्वागत करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद, सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे,
मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. संजय जाधव यांच्यासह अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी कुंभारी गावातील छोट्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनातील पैलू आपापल्या परीने मांडत त्यांच्या कार्याचे गुणवर्णन केले. या सर्व विद्यार्थ्यांना मराठा सेवा संघ, सोलापूर यांच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांची प्रतिमा आणि पुस्तके भेट देऊन सन्मानित करण्यात आले. स्वप्नील पारधे या विद्यार्थ्याचे भाषण लक्षवेधी होते.
या सोहळ्यात मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हा यांच्या वतीने परिस्थितीशी संघर्ष करून आपल्या मुलांना उच्चस्थानी पोहोचविण्यात योगदान दिलेल्या शिवमती सुनिता रविंद्र पठाडे, शिवमती मालनबाई दादाराव वडणे, जहिराबी जियाऊद्दीन पटेल आणि नादानबी रूबाबखाँ पठाण यांना राष्ट्रमाता जिजाऊ सन्मान आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रमाता जिजाऊ यांची प्रतिमा, शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तके असं या पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रा. जीवन यादव, संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवश्री सोमनाथ राऊत, मोहोळ तालुका अध्यक्ष सखाराम साठे, बामसेफ मराठवाडा विभाग अध्यक्ष सूर्यकांत गायकवाड, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अशोक दिलपाक, पोलीस हवालदार यादव, सुनील लोंढे, शिवश्री मोहन बरडे, शिवश्री दीपक वडणे, रूबाब पठाण आणि पत्रकार शेख इक्बाल (कासेगांव) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील लोंढे यांनी तर सूत्रसंचालन सुहास वडणे सर यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या शोभा वडणे, रोहिणी कापसे, संजीवनी वडणे, सचिन दिलपाक, सुहास वडणे सर, ओम विलास वडणे, जयराज वडणे, संकेत दिलपाक, बळीराम भगत, संकेत दिलपाक, मोहन बरडे, पोलीस पाटील विठ्ठल वडणे, पत्रकार रमजान मुलाणी(कासेगांव), बाबा दिलपाक, दत्ता तांबे, दीलपाक प्रतिष्ठान आणि बहुजन सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्यासह अन्य ग्रामस्थ आणि महिलांचीही उल्लेखनिय उपस्थिती होती.
















