सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने येत जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश दिले जाणार आहेत. त्यात एससी एसटी मागासवर्गीय प्रवर्गातील सर्व मुला-मुलींना तसेच सर्व जाती धर्मातील मुलींना यात समावेश असून फक्त मराठा व एन टी प्रवर्गातील मुलांचा ना वगळण्यात आले आहे त्यामुळे या प्रवर्गातील मुलांवर अन्याय होत असून सरसकट सर्वच मुलांना मोफत गणवेश देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने सादर करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जाणार आहेत त्यासाठी शासनाने 215 कोटी 53 लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे त्यातून सोलापूर जिल्ह्याला आठ कोटी 90 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीतून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पहिली ते आठवी तील मुला-मुलींना केंद्र व राज्य सरकारच्या मदतीतून दरवर्षी दोन गणवेश मोफत दिले जातात. गणवेश वाटप भूमिकेतून राज्य शासन मराठा व एनटी. प्रवर्गातील शालेय विद्यार्थ्यावर अन्याय करते. या विद्यार्थ्यांच्या मनात बालपणापासूनच जातीय द्वेष ची भावना उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे राज्य शासनाने त्वरित मराठा व एनटी प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना पण मोफत गणवेश देण्याची तरतूद करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे करण्यात आली आहे.
अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी शहराध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जाधव, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपप्रमुख सिताराम बाबर, उपाध्यक्ष नागेश पवार, महेश भंडारे, सचिव सुलेमान पिरजादे, लक्ष्मण माने, गणेश दहीहंडे, सोपान यादव, मुश्ताक शेख ईत्यादी उपस्थित होते.

















