Thursday, March 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : गंगेवाडी, नान्नज अभयारण्यात केवळ 220 डुकरं? ; आली तर कळपाने येतात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 May 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर : रान, तिथं पशू-पक्षी हे निसर्ग चित्र सर्वत्र असतं. जिथे वन्यजीवांचा प्रमाण कमी असतं तिथं के वाढीस लागावा म्हणून शासनाने आरक्षित केलेल्या वन परिसरात रानटी पशुपक्ष्यांची साखळी जतन करण्याचे काम शासन करीत असते. गंगेवाडी आणि नान्नज अभयारण्य परिसरात या साखळीतील काळवीटांबरोबरच रानडुकरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या प्राण्यांमुळे गंगेवाडी, नान्नज पंचक्रोशीत पिकांचे नुकसान होत असून या दुष्टचक्रात शेतीतील पिकांबरोबरच शेतकरीही महासंकटात सापडल्याचे चित्र दिसत आहे.


बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रात्री चांगला प्रकाश असतो. या प्रकाशात पाणवठ्यावर आलेल्या प्राणी, पक्ष्यांची गणना करणे सोपे जाते. ही बाब लक्षात घेऊन, मे रोजी रात्रीपासून वन्यजीव व पक्ष्यांच्या गणनेस प्रारंभ झाला ती गणना मंगळवारी पहाटेपर्यंत झाली. ही गणना सोयीकृत व्हावी, याकरिता वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच स्थानिक नागरिक आणि वन्यजीवप्रेमींची ही मदत घेण्यात आली. 


नान्नज अभयारण्य परिसरात १८ ठिकाणी असलेल्या पाणवठ्यांजवळ निरीक्षण केले. तिथे वॉच टॉवर,लपणगृह यांची व्यवस्था करण्यात आली होती. अभयारण्यात विविध भागात वॉच टॉवर उभारण्यात आले होते. टॉवरवर बसून वन्यजीवप्रेमींनी प्राणी व पक्ष्यांची गणना केली. यासाठी त्यांना नोंदवही देण्यात आली होती. या नोंदवहीतील नोंदीतून पुढे आलेल्या धक्कादायक आकडेवारीत सर्वात जास्त काळविटांची संख्या ३७४ तर त्यापाठोपाठ रानडुक्कर संख्या २२० नोंदवली गेली आहे. या रानडुक्करांच्या वाढत्या टोळ्या शेतीच्या अस्तित्वाला धोका निर्माण करीत असल्याची भीती पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

…………..

रान डुकरांच्या त्रासामुळे भुईमूगसह अनेक पिके गायब


दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या नान्नज आणि गंगेवाडी अभयारण्यानंतर सोलापूर जिल्ह्याची हद्द संपते. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या या अभयारण्य परिसरातील शेतकरी कालपर्यंत रब्बी ज्वारीबरोबर खरीप हंगामात भुईमूग, मका यासारखी अनेक पिके घेत होते, आजमितीला भुईमूग पेरणीच्या पहिल्या रात्री शेंगदाणे वेचून खाणाऱ्या डुक्करांमुळे भुईमूगासह अनेक पिकांची पेरणी अन् लागवड लोप पावत चालली आहे.

…………………..


रान डुक्कर आले कुठून ?


कधीकाळी वनविभागाच्या अभयारण्यात हरीण- काळवीट, लांडगा, ससा, खोकड, मुंगूस, रानमांजर, 

मोर, सायाळ, घोरपड, कोल्हा, तरस असे वन्य प्राणी आढळायचे, आता नोंदवहीत नीलगायींचीही नोंद झालीय.विदर्भात या निलगायी पिकांच्या सर्वात मोठ्या नुकसानकारी म्हणून गणल्या जातात. आपल्याकडील वनविभागाच्या क्षेत्रात डुक्कर आले कोठून ? या प्रश्नाचं मिळणारं उत्तर मजेशीर आहे.

………….

डुकरांच्या पाठीमागे आहे मोठे अर्थकारण


सोलापूर तुळजापूर रस्त्यावर गेल्या दोन दशकापूर्वी एका सूत मिल परिसरात डुक्कर आणि भरून चाललेला टेम्पो पलटी झाला होता. त्यावेळी अपघात ग्रस्त टेम्पोतून आपला जीव बचावून पळालेल्या शहरी डुकरांनी रानात आश्रय घेतल्याने त्यांच्याकडे आज रानडुक्कर म्हणून पाहिले जाते. पुढील काळात रान डुक्करांचे मांस खाणाऱ्या माणसांनी रानावनात छोटी पिल्ले सोडून जायची आणखी मोठी झाल्यावर पकडून न्यायची असं चक्र सुरू केलं. या चक्रात त्या वर्गाचं अर्थकारण लपलेले असलेतरी त्यात सामान्यांची शेती आणि शेतकरी भरडला जातोय.

…………………


रानडुकरांचा होऊ शकतो ; मानवी जीविताला धोका


शेतात पिकाची पेरणी वा लागवड केल्यानंतर त्याची राखण करणारा शेतकऱ्याने हरिण काळविटांना हाकलले तर ते कळपासह पळून जातात मात्र रानडुक्कर कधी कधी शेतकऱ्यांच्या अंगावर धावून येतात. रानडुकर शेतात पाळलेल्या कुत्र्यांनाही चावा घेतात, त्याचा मानवी जीविताला धोका होऊ शकतो, अशी भिती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

………………….


शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची ; कोणी घेत नाही दाद वा फिर्याद


ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे हरिण काळविट अथवा रानडुक्कर नुकसान करतात त्यावेळी वन विभागाचे अधिकारी वा कर्मचारी त्याची दाद ना फिर्याद अशा अविर्भावात वावरत असल्याची भावना शेतकर्‍यांतून व्यक्त केली जाते. वनविभागाचे अधिकारी त्यापुढे जाऊन, रानडुक्कर आम्ही पाळले नसल्याचेही सांगतात. वन्यजीव नोंदवहीत रानडुक्करांची संख्या २२० नोंदविली गेलेली असली तरी वास्तवात ही संख्या फार मोठी असल्याचे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

……………….


रानडुक्कर अन् हरीणांमुळे गंगेवाडी, नान्नज अभयारण्य परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतीतील पिकांबरोबरच शेतकरीही महासंकटात सापडला असून शासनाने गंगेवाडी, नान्नज अभयारण्य वन्यजीवांच्या नोंदवहीतील नोंदीकडे ‘डोळस’ पणे पाहून शेतकरी वर्गाला या महासंकटाच्या गर्तेतून वर काढावं, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातून विदेशी वृक्षांच्या प्रजाती हद्दपार करा ; हरित वसुंधरा फाउंडेशन आक्रमक

Next Post

देवेंद्रभाऊ, आपलं ठेवायचं झाकून अन् लोकांचं …… सोलापूर महानगरपालिकेवर कधी काढणार मोर्चा?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

देवेंद्रभाऊ, आपलं ठेवायचं झाकून अन् लोकांचं ...... सोलापूर महानगरपालिकेवर कधी काढणार मोर्चा?

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972736
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group