भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष समजला जातो, पक्षामध्ये अनुशासन समिती आहे, त्यामार्फत कारवाई होते, समितीचा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर वॉच असतो, भाजपचे देशात बहुमत आहे, अनेक राज्यात सत्ता आहे, सोलापूर महापालिकेत सत्ता आहे, झेडपीत अध्यक्ष आहे, शहर जिल्ह्यात 5 आमदार आहेत एकीकडे असे असताना दुसरीकडे मात्र सोलापूरात भारतीय जनता पक्षाची प्रतिमा दिवसेंदिवस मालिन होतानाचे चित्र आहे, लिंगायत समाजाचे धर्मगुरू समजले जाणारे डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बेडा जंगम पोटजात असलेला अनुसूचित जातीचा दाखल्याच्या आधारे लोकसभा निवडणूक लढवली, ते विजयी झाले मात्र त्यांचा जात दाखला बनावट असल्याची तक्रार पत्रकार मिलिंद मुळे व रिपाइं पीजी गटाचे प्रमोद गायकवाड यांनी केली, दाखला बोगस असल्याचे सिद्ध झाले मात्र खासदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तूर्त स्टे आणला, त्यानंतर आमदार विजय देशमुख यांचे समर्थक भाजपचे शहरातील नगरसेवक सुनील कामाठी हे मटका प्रकरणात अडचणीत आले, कामाठी यांचा मटका घेणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाला आणि कामाठी यांना फरार व्हावे लागले, नंतर कामाठी अटक झाले, मात्र आता त्यांना 2 वर्षासाठी पोलिसांनी तडीपार केलंय, हे प्रकरण शहरात भाजपला मालिन करणारे होते, त्यानंतर तर उपमहापौर राजेश काळे यांनी कहर केला, उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत खंडणी मागितली, ती ऑडिओ क्लिप इतकी व्हायरल झाली की राजेश काळेंची लायकी समजली , त्यांनी या प्रकरणात आपले नेते आमदार सुभाष देशमुख यांची तर घालवलीच मात्र उपमहापौर पदाला काळीमा फासली, यात फरार, अटक,जामीन हे सर्व पहायला मिळाल. आता त्यांच्या सदस्य रद्दचा ठराव सभागृहात आणला जाणार आहे, मागील काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथून शिवसिद्ध बुळळा याला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली, खासदार डॉ जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या बनावट जात दाखला प्रकरणात बुळळा याच्यावर संशय होता, त्याला अटक करण्यात येऊन त्याच्याकडून बरीच कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, बुळळा याने महापौर उपमहापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य सरपंच अशा अनेकांना बनावट दाखले दिल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे पोलीस प्रशासनाने कुणाकुणाला बनावट जात दाखले दिले याचे नावासहित यादी प्रसिद्ध करावी असेही आता मागणी होत आहे या प्रकरणात तर भारतीय जनता पार्टीची बदनामी तर होतच आहे मात्र थेट खासदार जयसिद्धेश्वर हे चांगलेच अडचणीत आले आहेत महापालिकेतील सभागृह नेते श्रीनिवास करली यांनाही भाजपाच्या एका ज्येष्ठ नगरसेवकांने मारहाण केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे त्याच बरोबर शोभा बनशेट्टी या महापौर असताना भर सभागृहात सभागृह नेते संजय कोळी यांनी खालच्या भाषेत बोलून भाजपची प्रतिमा मलीन केली होती यानंतर आता लोकमंगल दूध भुकटी प्रकरण समोर आले आहे यामध्ये माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे या प्रकरणात त्यांचे चिरंजीव रोहन देशमुख अक्कलकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी , शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर यांच्यावर दोषारोपपत्र दाखल झाले आहे, या प्रकरणात ही भारतीय जनता पार्टीचे मोठे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. एकूणच बुळळा अटक प्रकरणानंतर पोलीस प्रशासन आणि तपास अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती बाहेर आली नाही हे विशेष म्हणावे लागेल, बुळळाची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे, मात्र या प्रकरणात खासदार डॉ जयसिद्धेश्वर स्वामी बदनामीच्या खाईत लोटले गेले आहेत, त्यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी खुद्द भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून होऊ लागली आहे.