सोलापूर:- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते सुमीत गडगी यांची सोलापूर शहर विद्यार्थी कॉंग्रेस संघटना (NSUI) च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी युवक काँग्रेसचे नूतन अध्यक्ष गणेश डोंगरे, युवा नेते अंबादास करगुळे, नगरसेवक विनोद भोसले, युवक कॉंग्रेस नूतन प्रदेश सरचिटणीस सुमीत भोसले, चिटणीस प्रवीण जाधव, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष महेश जोकारे, शहर उपाध्यक्ष राजासाब शेख, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, योगेश मार्गम, सुभाष वाघमारे, राजेंद्र कांबळे, उत्तर उपाध्यक्ष शरद गुमठे, संजय गायकवाड, सुनील सारंगी, सुशीलकुमार म्हेत्रे, शिव कोरे, प्रतीक शिंगे, रोहन साठे, शिवकुमार कलशेट्टी, अविराज आनंदकर, शुभम माने, प्रतीक शिंगे, आनंद भंडारे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.


















