सोलापूर : महामानव, विश्वभूषण, बोधिसत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापुरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादनासाठी सकाळपासूनच जनसागर लोटला. पोलीस प्रशासनाने रविवारी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अभिवादनाला निर्बंध घातले असतानाही त्यांनी बंधनांना झुगारून असंख्य भीम अनुयायी बाहेर पडले. पोलीस प्रशासनही काही करू शकले नाही.
महापालिकेच्या वतीने महापौर श्रीकांचना यंनम यांनी अभिवादन केले, काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने माजी आमदार आडम मास्तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहराध्यक्ष ऍड बडेखान जिल्हाध्यक्ष नाना कदम, बहुजन समाज पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष देवा उघडे, रिपाइं गवई गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
अभिवादनानंतर आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान व लोकशाही धोक्यात आहे, त्यासाठी उठाव आवश्यक असून आता कोणत्याही पक्षांकडून अपेक्षा नाही तर जनतेतून लोकशाही वाचवण्यासाठी संघर्षाची गरज आहे.काय म्हणाल्या प्रणिती पहा हा व्हिडीओ
आडम मास्तर म्हणाले, भारतीय राज्य घटना ही देशाचा आत्मा आहे मात्र देशातील भांडवलदार व जातीयवादी लोक घटनेवर प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला विरोध केला पाहिजे, आपण जर बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर चाललो तर ही घटना व लोकशाही अबाधित राहील काय म्हणाले आडम पहा….
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...
सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...